🕒 1 min read
अमरावती: शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळीसाठी कोण जबाबदारी आहे, यासंबंधीचे आरोप-प्रत्यारोप अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल अमरावती दौऱ्यावर येण्याचं सूतोवाच केल्याच्या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत येऊन त्यांना काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का, असा सवाल केला होता. आता यावरच किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत प्रतिउत्तर दिले आहे.
महाराष्ट्राचे काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर सांगतात की, किरीट सोमैया अमरावतीला येऊन काय करणार? तर आम्ही ठाकरे सरकारच्या राज्यात होत असलेली हिंदूंची अवहेलना थांबविणार. अमरावती येथे त्यांच्यावर हल्ले झाले, त्यांचा संपतीची तोडफोड करण्यात आली.आम्ही त्यांच्या सोबत उभे राहणार आहोत. असे ट्वीट करत किरीट सोमय्या यांनी यशोमती ठाकूर यांना चांगलाच टोला लगावला आहे.
महाराष्ट्राचे काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर सांगतात
"किरीट सोमैया अमरावतीला येऊन काय करणार…." !!??
आम्ही ठाकरे सरकारचा राज्यात होत असलेली
"हिंदू ची अवहेलना थांबविणार" अमरावती येथे त्यांचा वर हल्ले झाले, त्यांचा संपतीची तोडफोड करण्यात आली…आम्ही त्यांचा सोबत उभे राहणार
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 17, 2021
दरम्यान त्रिपुरा येथील कथित हिंसाचार प्रकरणी अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाजानं बंदचं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या जमावानं दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. या घटनेचा निषेध म्हणून 13 नोव्हेंबर रोजी भाजपने बंद चं आवाहन केलं होतं. या दिवशीही मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरून त्यांनीदेखील हिंसक कारवाया केल्या. तेव्हापासून अमरावती शहरात तणावपूर्ण शांतता असून चार ते पाच हजार पोलीस सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात आहेत. तर या सर्व दंगलींसाठी भाजप जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तर भाजप नेत्यांनी या दंगलीमागे मलिकच आहेत, असा प्रत्यारोप केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भारत-न्यूझीलंडचा आज पहिला टी-२० सामना; रोहित-राहुल पर्व सुरु
- इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू, लक्ष्य सेनची विजयी सुरुवात
- मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा: विदर्भाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
- टीम इंडियामध्ये कोहलीच्या भूमिकेबाबत रोहितचे स्पष्टीकरण; म्हणाला..
- पोलिसांचा विरोध तरीही अमरावती दौऱ्यावर किरीट सोमय्या ठाम!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
