Share

भारत-न्यूझीलंडचा आज पहिला टी-२० सामना; रोहित-राहुल पर्व सुरु

Published On: 

🕒 1 min read

जयपूर: आजपासून भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या नव्या कर्णधार-प्रशिक्षक जोडीच्या पर्वाला प्रारंभ होणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील अपयशानंतर न्यूझीलंड संघ थेट भारतात पोहचला आहे. तर भारतीय संघ पहिल्या टी-२० सामन्यात वर्चस्व गाजवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

दरम्यान विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताला यंदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. तसेच कोहलीने स्पर्धेपूर्वीच ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपद सोडले. त्यातच रवी शास्त्री यांचाही मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यामुळे आता ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्सला पाच वेळा जेतेपदाचा किताब मिळवून देणारा रोहित आणि युवा खेळाडूंना पैलू पाडण्यात पटाईत असलेला द्रविड यांची जोडी आता भारतीय क्रिकेटचा नवा पर्व सुरु करणार आहे.

दरम्यान, जयपूरच्या सभोवताली असणाऱ्या शहरांत सध्या वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे आता याचा परिणाम सामन्यावरही होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने कसोटी मालिकेपूर्वी पुरेशी विश्रांती मिळावी, या हेतूने ट्वेन्टी-२० मालिकेत न खेळण्याचे ठरवले आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज टिम साऊदी न्यूझीलंडचे नेतृत्व करणार आहे. तर कोहली, शिखर धवन यांसारख्या प्रमुख फलंदाजांच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर या युवा फळीच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!