Share

‘हिम्मत असेल तर केंद्रातील मोदी सरकार बरखास्त करुन बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊन दाखवा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपच्या प्रदेश कायर्कारिणीत महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची सूचना आल्यानंतर त्याचे पडसाद राजकारणात चांगलेच उमटू लागले आहेत. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यास आव्हान दिले आहे. ‘भाजपमध्ये हिम्मत असेल तर केंद्रातील मोदी सरकार बरखास्त करुन बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊन दाखवा’, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले.

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते सैरभैर झाले आहेत. दोन वर्ष वारंवार हे सरकार पाडण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले, राजभवनाच्या माध्यमातूनही प्रयत्न करुन काही उपयोग झाला नाही. सीबीआय, ईडी, आयकर, एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातूनही मविआ सरकारमधील मंत्री व नेत्यांवर खोट्या केसेसच्या टाकून कारवाई करण्यात आली, महाराष्ट्राला बदनाम केले परंतु सरकार पडत नाही उलट ते भक्कम झाले आहे हे पाहून भाजप नेत्यांना नैराश्याने ग्रासले आहे. या नैराश्येतूनच महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्याची भाषा केली गेली आहे. भाजपत हिम्मत असेल तर केंद्र सरकार बरखास्त करुन बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, भाजपचा पराभव नक्की होईल, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजप एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान करत आहे. भाजप सत्तेत असताना एसटी विलिनीकरणाविरोधात भूमिका घेतली होती आणि आता तेच मागणी करत आहेत. केंद्रात सत्तेत असलेले भाजपचे सरकार एलआयसी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, भेल, अशा सरकारी कंपन्या उद्योगपतींना विकत आहे आणि येथे मात्र एसटीचे विलिनीकरण करण्याची भूमिका घेत आहे, ही भाजपची भूमिका दुटप्पी आहे, असा आरोपही नाना पटोलेंनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!