Share

‘आंदोलनाचा आज सातवा दिवस, या बिनकाळजाच्या सरकारला कधी जाग येणार?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सहभागी झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत इथून हालणार नाही. असा पावित्रा सदाभाऊंनी घेतला आहे. याबाबत सदाभाऊंनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले, लढा विलगीकरणाचा, धडक मोर्चा एसटी कामगाराच्या या आंदोलनाच्या सातव्या दिवशी आझाद मैदान वर एसटी कर्मचारी कामगार वर्गाने महा विकास आघाडी विरुद्ध काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. या बिनकाळजाच्या सरकारला कधी जाग येणार ? परंतु आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या असल्या तरी विलीनीकरणाच्या मागणीसाठी मात्र कर्मचारी अडून बसले आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठीच राज्य सरकारने एक समिती देखील नेमली आहे, मात्र या समितीवर एसटी संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. या समितीवर आम्हाला विश्वास नाही. त्यामुळे निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात यावी, अशी विनंती संघटनांनी उच्च न्यायालयात सोमवारी केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!