🕒 1 min read
मुंबई : देशात असलेल्या वाढत्या महागाईविरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाेचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेतृत्व केले आहे. ‘महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणं राज्य सरकारच्या हातात नाही, पेट्रोलियम कंपन्या महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या नाहीत, त्यामुळे दर कमी करणं हे केंद्र सरकारचं काम आहे’, असं संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
संजय राऊतांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. ‘सध्या महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या ठाकरे सरकारच्या हाती वसुलीच्या कले व्यतिरिक्त काहीच नाही…’, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
सध्या महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या ठाकरे सरकारच्या हाती वसुलीच्या कले व्यतिरिक्त काहीच नाही… pic.twitter.com/ilfdHESfhd
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 13, 2021
दरम्यान, केंद्र सरकार राज्य सरकारची आर्थिक कोंडी करत आहे. सरकार पाडण्यासाठी रोज भाजपची कारस्थाने सुरू आहेत. भाजपचे लोक महागाईबद्दल बोलत नाही. त्रिपुऱ्यात घडलेल्या कोणत्यातरी घटनेसाठी भाजपा महाराष्ट्रात आंदोलन करत आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- त्याला त्रास होईल म्हणून ऐकून घेतोय, नाही तर हिसका दाखवला असता- अजित पवार
- …तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्हाला त्यांना संपवावं लागेल- नितेश राणे
- आमचं सरकार पाडण्यासाठी भाजपची कारस्थानं सुरु आहेत- संजय राऊत
- “…तर मी माझा पुरस्कार परत करेन”; कंगनाची प्रतिक्रिया
- हसन अलीला ट्रोल केल्याबद्दल पाकिस्तानी चाहत्यांवर भडकला हरभजन, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
