🕒 1 min read
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर आहेत. राज्यात गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. एकीकडे उच्च न्यायालयाने संप थांबविण्याचा आदेश दिलेला आहे, तर दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. तसेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही संपाला पाठिंबा दिला.
मात्र या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारण्यात आला असता ते संतापले. नवाब मलिक यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना पाकिस्तानात पाठवा असंही यावेळी नितेश राणे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केलेत. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिकांचे कौतूक केले. तर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आम्ही कोणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र, भाजपा नेते मलिकांविरुद्ध आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबईत आंदोलनस्थळी मलिक यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर आमदार नितेश राणे चांगलेच संतापले. नबाब मलिक हा गद्दार आहे. अतिरेक्यांना साथ देणारा देशद्रोही आहे, त्याच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देता कामा नये, त्याला पाकिस्तानला हाकलून द्या, असे म्हणत नितेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर जहरी टीका केली. नबाव मलिक मंत्रिमंडळात आहेतच कसे? त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणीही राणे यांनी केली.
‘तुम्ही पत्रकार मित्रसुद्धा कशाला त्यांची मुलाखत घेता’, असा प्रश्न त्यांनी माध्यमांनी विचारला. तसेच उद्या मुंबईत बॉम्ब फोडला तर सर्वात पुढे नवाब मलिक असेल, अशा अतिरेक्यांची मदत करणाऱ्या देशद्रोहींना आधी हकलवलं पाहिजे’ असंही नितेश राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना कोर्टाचा दिलासा नाहीच; ईडीची कोठडी 15 नोहेंबरपर्यंत कायम
- जय श्री राम म्हणणारे मुनी नाही, तर राक्षस; काँग्रेस नेते राशीद अल्वींचं वादग्रस्त वक्तव्य
- पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय; सेना-राष्ट्रवादीलाही यश, काँग्रेस मात्र…
- ‘कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का?’
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

