Share

‘कोण नितेश राणे? त्यांची मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची पात्रता आहे का?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर आहेत. राज्यात गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. एकीकडे उच्च न्यायालयाने संप थांबविण्याचा आदेश दिलेला आहे, तर दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. तसेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही संपाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर यांच्यावर जहरी भाषेत टीकाही केली.

यावर शिवसनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘नितेश राणे यांचे आरोप आम्ही मोजतच नाही. कोण नितेश राणे? त्यांची मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची पात्रता आहे का? त्यामुळे त्यांच्या आरोपांना आम्ही महत्व देत नाही, असे परब म्हणाले. ‘कालपर्यंत दोन हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यापुढे ही कारवाई अधिक कडक करु. एसटी कर्मचाऱ्यांचं कधीही न भरुन येणारं हे नुकसान गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत भरुन देणार का? असा सवालही अनिल परब यांनी केलाय.

काय म्हणाले होते नितेश राणे?
‘भाजप सरकारमध्ये दिवाकर रावते हे कोणाच्या मांडीला मांडी लावू बसले होते. मुख्यमंत्री भाजपचे असतानाही परिवहन महामंडळ शिवसेनेकडेच होतं, त्यावेळी का आग्रही मागणी केली नाही. शिवसेनेची एसटीमध्ये कामगार संघटना आहे, त्यांनीही का बोलले नाही. उगाच, भाजपकडे बोट दाखविण्यात काय अर्थ आहे, असे म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. तसेच, विलिनीकरणाला वेळ लागणार आहे, मग एक दिवसांच विशेष अधिवेशन बोलवा. उद्या किंवा परवा एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा, आम्ही सगळेच्या सगळे आमदार येतो, एकमुखी पाठिंबा देतो, एक आमदार विरोध करणार नाही, असे नितेश राणेंनी म्हटले. मुख्यमंत्र्यांच्या सोयीसाठी मुंबईतच हे अधिवेशन बोलवा, नागपूरलाही नको, असेही राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!