🕒 1 min read
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपाने आता वेगळं वळण घेतलं असून हे आंदोलन आणखी चिघळलं जात आहे. त्यातच अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने ‘ना काम, ना दाम’ यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिला आहे. यावरुन भाजपने राज्य सरकारवर टीका करण्याची एक संधी सोडली नाही. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे.
अनिल परब यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता ‘या न्यायाने गेले दीड वर्ष मंत्रालयात पाऊल न ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांना देखील वेतन आणि भत्ते मिळता कामा नयेत… ना काम ना दाम…’, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत. याबाबत अतुल भातखळकरांनी ट्वीट केलं आहे.
या न्यायाने गेले दीड वर्ष मंत्रालयात पाऊल न ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांना देखील वेतन आणि भत्ते मिळता कामा नयेत… ना काम ना दाम… pic.twitter.com/BI9EspNxbI
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 11, 2021
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून 350 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकारने त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …हा सगळा ड्रग्ज रॅकेटचा खेळ गुजरातमधून चालतोय का?- नवाब मलिक
- जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही- गोपीचंद पडळकर
- काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांनी घेतली आमदारकीची शपथ
- ठाकरे सरकारचा निर्णय, मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढली
- राष्ट्रवादीचे सहकार पॅनेल जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

