Share

‘मेरे पुतले जला लो तुम, ये शोला कम नहीं होगा’, भाजपच्या आंदोलनावर मलिकांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या दररोज आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरूच आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांचे गुन्हेगारांना कसे संरक्षण आहे आणि राज्यात बनावट नोटांचा खेळ कसा सुरु होता याचा गौप्यस्फोट केला होता. नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांवरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहे. राज्यभरात ठिकठिकाणी भाजपच्या वतीने नवाब मलिकांचा पुतळा जाळत जोरदार आंदोलन करण्यात आले आहे.

नवाब मलिक यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. या आंदोलनादरम्यान शेकडो कार्यकर्ते जमले होते. यावेळी मलिकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. मंत्रालय, औरंगाबाद, पुणे, जालना यासह राज्यात ठिकठिकाणी नवाब मलिकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळण्यात आले. या आंदोलनानंतर मलिक पुन्हा आक्रमक झाले आहे.

यानंतर मलिक यांनी भाजपाला डिवचणारे ट्विट केले आहे. ‘मैं सच्चाई पे हूँ और सच का जज़्बा कम नहीं होगा, मेरे पुतले जला लो तुम ये शोला कम नहीं होगा’ असे म्हणत त्यांनी पुन्हा आव्हान दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!