🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन अधिकच चिघळत असल्याचे दिसत आहे. एकीकडे राज्यसरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असले तरी एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अशातच आता भाजपनेही त्यांच्या या आंदोनलात उडी घेतली असून राज्यसरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे.
राज्य सरकारला नाईलाजाने काही पावलं उचलावी लागतात, पण तसे होऊ नये असे मला वाटते. राज्याच्या हिताच्या दृष्टीने एसटी कर्मचाऱ्यांनी विचार करायला हवा. आम्ही नेहमीच कामगारांच्या बाजूने उभे राहिलो आहोत. पण राज्य आणि राष्ट्राचे हीत पाहिले पाहिजे. संपामुळे राज्याचे हीत धोक्यात येत असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी एकदा तरी विचार करायला हवा, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भाजप नेते एसटी कर्मचाऱ्यांना खोटी सहानुभूती दाखवत त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यां त्यांच्या प्रश्नांविषयी सहानुभूती आहे. शिवसेनेचा जन्मही कामगार क्षेत्रातूनच झाला आहे. संपूर्ण राज्यात शिवसेना कष्टकऱ्यांचं नेतृत्व करत आहे. त्यामुळेएसटी कर्मचाऱ्यांविषयी आमची भूमिका चुकीची आहे हे सांगण्याची आम्हाला गरज नाही, असंही संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कर्मचाऱ्यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका’
- सध्या होत असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी- देवेंद्र फडणवीस
- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात पडळकर, सोमय्यांचा सहभाग; मुंबई पोलिसांकडून अटक
- गोळ्या घाला, फाशी द्या पण आम्ही आंदोलनावर ठाम; एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
- एसटीचा संप संपेना! मुख्यमंत्र्यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन


