Share

‘नवाब मलिक यांचं डोकं ठिकाणावर नाही, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज’, दरेकरांचा टोला

Published On: 

मुंबई : राज्यातील ड्रग्स प्रकरणावरुन सुरु झालेलं राजकारण आता अंडरवर्ल्डपर्यंत पोहचलं आहे. मलिकांनी ड्रग्स प्रकरणात देवेंद्र फडणवीसांवर आरोप लावले होते. त्यानंतर मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. त्यानुसार फडणवीसांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मलिकांचे १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत जमीन व्यवहार केल्याचे पुरावे समोर आणले. तेव्हा मलिकांनी मी हायट्रोजन बॉम्ब फोडणार असं म्हटलं.

नवाब मलिकांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना रियाज भाटी नावाचा उल्लेख केला. दोन पासपोर्ट बनवणाऱ्याला अटक केलेली असताना २ दिवसांत कसं सोडलं? असा दावा मलिकांनी केला. रियाज भाटी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात त्यांच्या जवळ जाऊन फोटो काढतो असं म्हटलं.

यावर भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नवाब मलिक यांचं डोकं ठिकाणावर नाही. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचा टोला लगावला आहे. मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप फुटकळ आहेत. मलिकांच्या आरोपाला कसलाही आधार नाही. कुठल्याही प्रकारची कागदपत्रे सादर न करता पुरावे सादर न करता केवळ आरोप करत राहणं अशा प्रकारचं काम ते करत आहेत. मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींशी संबंध समोर आलेले आहेत. आता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी दरेकरांनी केली.

नवाब मलिक यांनी आज हाजी अराफत शेख आणि मुन्ना यादव यांचं नाव घेतलं. माझा त्यांना सवाल आहे की हाच त्यांचा हायड्रोजन बॉम्ब होता का? काल जो देवेंद्र फडणवीस यांनी जो स्फोट केला आहे त्यातून ते अजूनही सावरलेले दिसत नाही. कारण त्यांचे १९९३ मधल्या आरोपी सोबतचे संबंध आता समोर आलेले आहेत, असं दरेकर म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!