औरंगाबाद : एका मागासवर्गीय अधिकाऱ्याने जावयाला अटक केल्याचे सहन न झाल्याने त्या द्वेषभावनेतून मंत्री नवाब मलिक यांनी माझा भाचा समीर वानखेडे व त्याच्या वडिलांची जात काढून त्रास देणे सुरू केले आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली आहे. वानखेडेंवर जातिवाचक आरोप करणारे मलिक यांच्यावर एट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी समीर यांच्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनी मुकुंदवाडी पोलिसांकडे तक्रार अर्जाद्वारे केली. समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या त्या सख्ख्या बहीण आहेत.
मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर मुस्लिम असल्याचे वक्तव्य करित असल्याने समाजात व नातेवाईकांमध्ये बदनामी होत आहे. यामुळे संतापलेल्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी नवाब मलिक यांच्यावर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी त्याबरोबर वंशावळ आणि जातीचे दाखले जोडले आहेत.
समीर वानखेडे यांचे कुटुंबीय नवबौद्ध नसून ते मुस्लिम आहेत, असे म्हणून कुटुंबाची बदनामी सुरु केल्याचा तक्रारीत आत्या गुंफाबाई यांनी केला असून त्यामुळे नातेवाईकांना मनस्ताप झाला असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
मुकुंदनगरात राहणाऱ्या गुंफाबाई यांनी तक्रारीत म्हटल्यानुसार, ‘त्यांचे पंजोबा कळण्या यांचा कचरू वानखेडे हा मुलगा होता. कचरू यांना तीन मुले व तीन मुली. पैकी शंकर कचरू, लक्ष्मण व ज्ञानदेव आहेत. गुंफाबाई या कचरू यांची मुलगी असून त्यांच्यासह समीर यांचे वडील ज्ञानदेव, बहीण बिना जमदाडे व सुमित्रा खंदारे या बहिणी आहेत. आमचे सर्व कुटुंब महार (नवबौद्ध) जातीचे प्रमाणपत्र आहे. परंतु समीरना त्रास देण्यासाठी, अपमान करण्यासाठी खोटी माहिती सांगून मलिक सतत त्या कुटुंबाचा अपमान करत आहेत. त्यामुळे अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी मुकुंदवाडीचे निरीक्षक मनोज पगारे यांच्याकडे केली. पगारे यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून वरिष्ठांशी चर्चा करून कारवाईचे आश्वासन दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय
- १४ कोटींच्या बनावट नोटांचं प्रकरण फडणवीसांनी दाबलं; मलिकांचा आरोप
- ४० एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेतलेले बेशरम सरकार मोर्च्याला सामोरे जाईल का?
- एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर धडक मोर्चा, मात्र पोलिसांकडून अडवणूक
- ‘काल यांचे मंत्री दिसले नाही, एसटी कामगार विचारत होते’, नितेश राणेंचा टोला

