Share

‘रियाज भाटी हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच पदाधिकारी’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना सरकारी पदे दिली. त्यांच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आलं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचं काम फडणवीसांनी केलं, असे गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केले.

तसेच रियाझ भाटी कोण आहे? २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम गँगसोबत त्याचे संबंध असल्याच्या बातम्या आल्या. दोन पासपोर्टसोबत पकडला जाऊनही तो दोन दिवसांत सुटला. तो भाजपाच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलवर का दिसत होता. पंतप्रधान आले असताना रियाझ भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले. तुमच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ चालत होता, असा गंभीर आरोप मलिकांनी केला. त्यानंतर आता भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रियाज भाटी हा भाजपाशी नव्हे तर राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा दावा केला.

केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये रियाज भाटीच्या जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती तेव्हापासून रियाज भाटी राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जनरल सचिव म्हणून तो काम करत होता असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रियाज भाटी प्रकरणावरुन नवाब मलिक स्वपक्षालाच अडचणीत आणतायेत का? असा प्रश्न निर्माण होतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!