🕒 1 min read
मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना सरकारी पदे दिली. त्यांच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आलं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचं काम फडणवीसांनी केलं, असे गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केले.
तसेच रियाझ भाटी कोण आहे? २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम गँगसोबत त्याचे संबंध असल्याच्या बातम्या आल्या. दोन पासपोर्टसोबत पकडला जाऊनही तो दोन दिवसांत सुटला. तो भाजपाच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलवर का दिसत होता. पंतप्रधान आले असताना रियाझ भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले. तुमच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ चालत होता, असा गंभीर आरोप मलिकांनी केला.
यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मलिक यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राणे यांनी मलिकांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत ‘नवाबभाई कहते है ‘रीयाझ भाटी दाऊद का आदमी है’ या वाक्यासोबत रियाझ भाटीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचे जुने फोटो ट्विटरवर पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.
नवाबभाई कहते है ‘रीयाझ भाटी दाऊद का आदमी है’….
Nawab Bhai says @riyazbhati is Dawood Ibrahim’s man… अरे ये कहना क्या चाहते हैं ?..
Does @NawabMalik bhai mean this ???? pic.twitter.com/LiYqNAAY1r— Nitesh Rane (@NiteshNRane) November 10, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जुने फोटो नितेश राणे यांनी ट्विट केले आहेत. या फोटोसोबत रियाझ भाटी दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय
- १४ कोटींच्या बनावट नोटांचं प्रकरण फडणवीसांनी दाबलं; मलिकांचा आरोप
- ४० एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेतलेले बेशरम सरकार मोर्च्याला सामोरे जाईल का?
- एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर धडक मोर्चा, मात्र पोलिसांकडून अडवणूक
- ‘काल यांचे मंत्री दिसले नाही, एसटी कामगार विचारत होते’, नितेश राणेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

