🕒 1 min read
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी आज पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानं बनावट नोटांचा खेळ सुरु होता, १४ कोटींच्या बनावट नोटांचं प्रकरण फडणवीसांनी दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. या सर्व प्रकरणावरुन आता भाजपकडून मलिकांवर टीकेची झोड उठत आहे. यावर आता भाजपचे नेते अतुल भातळकरांनी मलिकांवर टीके केली आहे.
नवाब मलिक फुसक्या फटाक्यांचा धूर खूप केलात, पण पुरावे कुठे आहेत? काल सनातन संस्थेवर केलेल्या बिनबुडाच्या आरोपामुळे तुम्ही पत्रकार परिषद घेऊन थापा मारता हे उघड झालेले आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
नवाब मलिक फुसक्या फटाक्यांचा धूर खूप केलात, पण पुरावे कुठे आहेत? काल सनातन संस्थेवर केलेल्या बिनबुडाच्या आरोपामुळे तुम्ही पत्रकार परिषद घेऊन थापा मारता हे उघड झालेले आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 10, 2021
दरम्यान, जेव्हा नोटबंदी झाली त्यावेळी खोट्या नोटा पकडले जाण्याचं प्रमाण संपूर्ण देशभरात वाढलं होतं. मात्र महाराष्ट्रातून खोट्या नोटांचं एकही प्रकरण समोर आलं नाही. ८ ऑक्टोबर २०१७ मध्ये इंटेलिजन्सकडून बीकेसीमध्ये छापेमारी झाली. ज्यात १४ कोटी ५६ लाखांच्या खोट्या नोटा सापडल्या. या प्रकरणाला फडणवीसांकडून दाबलं जाण्याकरता प्रयत्न झाले, असा दावा मलिक यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय
- १४ कोटींच्या बनावट नोटांचं प्रकरण फडणवीसांनी दाबलं; मलिकांचा आरोप
- ४० एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेतलेले बेशरम सरकार मोर्च्याला सामोरे जाईल का?
- एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर धडक मोर्चा, मात्र पोलिसांकडून अडवणूक
- ‘काल यांचे मंत्री दिसले नाही, एसटी कामगार विचारत होते’, नितेश राणेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
