Share

‘स्वतःवरील आरोप झाकण्यासाठीच फडणवीसांनी मलिकांचे प्रकरण बाहेर काढले’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील काही दिवसांपासून एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना बघायला मिळत आहे. तसेच मलिकांनी एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या अनुषंगाने भाजपावर देखील आरोप केले. याच पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांचे संबंध थेट अंडरवर्ल्डशी असल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे यासंदर्भात फडणवीसांनी कागदोपत्री पुरावे देखील सादर केले आहेत.

या सर्व प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मलिकांनी जमीन घेतल्याची माहिती होती. त्यावेळी त्यांनी हे प्रकरण समोर का आणले नाही. स्वतःचं प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी मलिकांचे प्रकरण काढले. आपल्यावर शेकाल्या जाते त्यावेळी त्या प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी दुसरी माहिती द्यायची. आपल्यावर झालेले आरोप दाबण्यासाठी फडणवीसांनी हे सगळं केलंय. मुख्यमंत्रिपदावर असताना फडणवीस यांनी कारवाई का केली नाही?’ असा प्रश्नही आंबेडकरांनी विचारला आहे.

फडणवीस यांचा आरोप काय?
नवाब मलिक यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शहावली खान या गुन्हेगारासोबत जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबईच्या एलबीएस रोडवरील २.८ एकर जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडे होती. त्यांच्याकडून ही साडेतीन कोटींची जागा नवाब मलिक तेव्हा सक्रिय असलेली कंपनी सॉलिडस कंपनीने खरेदी केली, असा दावाही त्यांनी केलाय.

नवाब मलिकांचे प्रत्युत्तर
‘देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करून राईचा पर्वत केला. देवेंद्र फडणवीस हे कागदपत्रे तपास संस्थांकडे देण्याचा इशारा देत आहेत. मात्र त्यांनी कुठे जायचे असेल, तिथे जावे आम्ही तयार आहोत. फडणवीस यांनी खोट्याचं अवडंबर माजवण्याचे काम केल्याचे मलिक यांनी म्हटले. तसेच, सलीम पटेल आणि सरदार वली खानबद्दलही माहिती दिली. सरदार वली खानचे गोवावला कंपाऊंडमध्ये आजही घर आहे. गेल्या ७० वर्षांपासून त्याच कंपाऊंडमध्ये वली खानचे वडील हे गोवावाल परिवारासाठी एका वॉचमनचं काम करत होते. जेव्हा आम्ही गोवावाला कुटुंबीयांकडून ही संपत्ती घेतली, त्यावेळी वली खान यांनी ३०० मीटर जागेवर आपलं नाव लावून घेतलं होतं. ज्यावेळी आम्ही नोंदणी कार्यालयात गेलो, तेव्हा ३०० मीटरचे पैसे देऊन आम्ही जागा विकत घेतल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

आम्ही कुठल्याही दबावात किंवा अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या आरोपींकडून आम्ही ही जागा विकत घेतली नाही, असे मलिक यांनी सांगितले. आम्ही पूर्णपणे भाडेकरू होतो, जागेच्या मालकीनीने आम्हाला जागा विकत घेण्याचं सांगितलं, तेव्हा तेथील वॉचमनने जागेवर आपलं नाव लावलं होतं, म्हणून आम्ही त्यास पैसे दिल्याचं मलिक यांनी स्पष्टीकरण दिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!