Share

एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने राज्य सरकारने उचलले ‘हे’ महत्त्वपूर्ण पाऊल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेला एसटीचा संप अजुनही सुरूच आहे. हे आंदोलन आता अधिक तीव्र होत आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारनं समिती स्थापन केली आहे. त्यानंतरही कामगार संघटना मागे हटायला तयार नाहीयेत. त्यामुळे अखेर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेविरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की, ‘एसटीचा संप सुरु आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी व्यवस्था करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन मागण्या मान्य केल्या गेल्या होत्या. पण आता विलिनीकरणासंदर्भात नवी मागणी समोर आली आहे. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर समिती स्थापन केली आहे. ही समिती पुढील विचारविनिमय करेल. उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशीर आहे असे जाहीर करुनही हा संप सुरुच आहे. न्यायालयाने सूचना केली आहे की अवमान याचिका दाखल करू शकता. त्यानुसार एसटी महामंडळ संपाबाबत अवमान याचिका दाखल करत आहे.’

राज्य सरकारमध्ये एसटीच्या विलिनीकरणाचा विषय हा धोरणात्मक निर्णय आहे. हा निर्णय घेताना सर्व बाबींचा विचार करुन निर्णय घ्यावा लागतो. एक-दोन दिवसांत हा निर्णय होणार नाही म्हणून चर्चा महत्वाची असल्याचेही अनिल परब म्हणाले.

तर, कागदोपत्री प्रक्रिया आज पूर्ण होऊ न शकल्यानं आज अवमान याचिका दाखल होऊ शकली नाही. त्यामुळं एसटी महामंडळ उद्या बुधवारी, सकाळी १० वाजता मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार आहे. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठापुढं उद्या एसटी संपाच्या प्रश्नावर सुनावणी होणार आहे. त्यामुळं उद्या सकाळी अवमान याचिका सर्व संबंधित कागदपत्रांसह दाखल करून उद्याच तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती हायकोर्टाला करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाच्या वकिलांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!