Share

‘हे तर ब्रम्हांडातल्या बेस्ट मुख्यमंत्र्यांचे हे प्रगती पुस्तक’, भाजपची बोचरी टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशातील ३३ लाख मुले ही कुपोषित असून त्यातील निम्मी मुले अती कुपोषित गटात असून त्यांचे प्रमाण महाराष्ट्र, बिहार, गुजरात या राज्यांत अधिक आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्रालयाने माहिती अधिकाराअंतर्गत दिली आहे. देशातील सर्वाधिक कुपोषित मुले महाराष्ट्रात असून ही संख्या ६.१६ लाख आहे. त्यात मध्यम कुपोषित मुले १.५७ लाख, तर जास्त कुपोषित मुलांची संख्या ४.७५ लाख आहे.

यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. ‘महाराष्ट्रात कुपोषित बालकांची संख्या ६ लाख १६ हजार असून देशात कुपोषित मुलांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. यापैकी अतिकुपोषित बालकांची संख्या तब्बल ४ लाख ५८ हजार आहे, तर १ लाख ५७ हजार बालकं मध्यम कुपोषित आहेत. हे ब्रम्हांडातल्या बेस्ट मुख्यमंत्र्यांचे हे प्रगती पुस्तक असल्याची बोचरे ट्विट भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

महाविकास आघाडी व भाजपमध्ये रोजच आरोप प्रत्यारोप सुरु आहे. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. महिला व बालकल्याण मंत्रालयाने कुपोषित बालकांची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारी मधून महाराष्ट्र हा कुपोषित बालकांच्या संख्येत अवलस्थानी असल्याचे दिसून येते. याच आकडेवारीचा आधार घेत भातखळकर यांनी हे ब्रम्हांडातल्या बेस्ट मुख्यमंत्र्यांचे प्रगती पुस्तक असल्याची बोचरी टीका आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!