🕒 1 min read
मुंबई : आर्यन खानच्या अटकेपासून मुंबईत सुरू झालेले ड्रग्ज प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच प्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर रोज वेगवेगळे आरोप करणारे महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आता कायदेशीर अडचणीत येण्याची शक्यता आहे.
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एसी-एसटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली असून एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. यापूर्वी वानखेडे कुटुंबीयांनी मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला असून त्यावर त्यांना मंगळवारी उत्तर दाखल करायचे असून या प्रकरणाची सुनावणी बुधवारी(९ नोव्हें.)ठेवली.
Mumbai: NCB officer Sameer Wankhede's father Dhyandev K Wankhede has filed complaint with Asst. Commissioner of Police, Oshiwara against Maharashtra Minister Nawab Malik under SC/ST (Prevention of Atrocities) Act for allegedly making false accusations regarding his family's caste pic.twitter.com/z2TJHi0b5o
— ANI (@ANI) November 8, 2021
दरम्यान, एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी ओशिवारा सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती कायद्यांतर्गत आरोप केल्याप्रकरणी महाराष्ट्र मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी कुटुंबाच्या जातीबाबत खोटे आरोप केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मलिक यांच्यावर एफआयआर नोंदवावा, अशी वानखेडे कुटुंबीयांची मागणी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही वारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास या…’, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
- एका महिलेचे नाव लोकांसमोर आणून खूप चांगले काम केलेस मित्रा’, वानखेडेंचा मलिकांवर निशाणा
- मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर क्रांतीचे संतप्त प्रत्युत्तर, ‘माझी बहिण पीडित आहे आणि..’
- एसटी कर्मचाऱ्यांबाबत ठाकरे सरकारने रडीचा डाव खेळू नये-आ.विनायक मेटे
- ‘…आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत’, धनंजय मुंडेवर फडणवीसांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
