🕒 1 min read
पंढरपूर : काल(८ नोव्हें.)संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन आणि पंढरपूरकडे येणाऱ्या अन्य महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बोलत असतांना पंढरपूरकडे जाणारे पालखी मार्ग हे भक्तीचे प्रतीक आहेत. या मार्गावरून जाणारे वारकरी भक्ती आणि शक्तीचा परिचय देतात, निर्मल वारीतून स्वच्छतेचा जागर करतात. सामाजिक सौहार्दाचे प्रतीक असलेल्या वारीत कोणाशीही भेदभाव होत नाही. ही वारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास’ या घोषवाक्याचे प्रेरणास्रोत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
या वेळी मोदी यांच्या हस्ते आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर या विस्तारित महामार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच याच कार्यक्रमात पंढरपूरकडे येणाऱ्या म्हसवड ते पंढरपूर, कुर्डुवाडी ते पंढरपूर, सांगोला ते पंढरपूर, टेंभुर्णी ते पंढरपूर आणि पंढरपूर- मंगळवेढा- उमदी या पाच महामार्गाचा लोकार्पण सोहळादेखील पार पडला. यावेळी मोदी म्हणाले की,’वारीची ही परंपरा राष्ट्र जोडणारी आहे. एवढी परकीय आक्रमणे झाली तरी या परंपरेत आजवर कधीही खंड पडलेला नाही. त्यामुळेच या परंपरेचे महत्त्व अजूनही टिकून आहे. रस्ते हे विकासाचे मार्ग असतात. पंढरपूरकडे येणाऱ्या या नव्या रस्त्यांमुळे केवळ सांस्कृतिक संपन्नता येणार नाही, तर या संपूर्ण भागाचाच विकास घडण्यास मदत होईल.’
दरम्यान, पंढरपूर येथे झालेल्या या कार्यक्रमात मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरचित्रसंवादाद्वारे सहभागी झाले होते. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, रस्ते विकास राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. तसेच पालखी मार्गावर पालखी तळ उभारण्याची सूचना गडकरींना केली. हे तत्काळ मान्य करत हे तळ राज्य सरकारतर्फे उभारण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरेंनी यावेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळायलाच हवा- प्रविण दरेकर
- एका महिलेचे नाव लोकांसमोर आणून खूप चांगले काम केलेस मित्रा’, वानखेडेंचा मलिकांवर निशाणा
- मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर क्रांतीचे संतप्त प्रत्युत्तर, ‘माझी बहिण पीडित आहे आणि..’
- एसटी कर्मचाऱ्यांबाबत ठाकरे सरकारने रडीचा डाव खेळू नये-आ.विनायक मेटे
- ‘…आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत’, धनंजय मुंडेवर फडणवीसांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
