🕒 1 min read
मुंबई : परळीमध्ये प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिचा नाचगाण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावरून, एकीकडे राज्यात एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या यासारखे प्रश्न प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना हे शोभत का? हा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला. या कार्यक्रमानंतर धनंजय मुंडेंवर टीका होते आहे. भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना दिवाळी साजरी करता आली नाही. कित्येकांची घरे उध्वस्त झाली, पोरा-बाळांप्रमाणे सांभाळलेली गुरं-ढोरं डोळ्यादेखत वाहून गेली त्याच मराठवाड्यातील बीडमध्ये मंत्री धनंजय मुंडे ऐन दिवाळीत डान्सर नाचवतायत. मंत्री मुंडे कडून हीच अपेक्षा आहे. pic.twitter.com/F7geRvcmnB
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 8, 2021
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना दिवाळी साजरी करता आली नाही. कित्येकांची घरे उध्वस्त झाली, पोरा-बाळांप्रमाणे सांभाळलेली गुरं-ढोरं डोळ्यादेखत वाहून गेली. त्याच मराठवाड्यातील बीडमध्ये मंत्री धनंजय मुंडे ऐन दिवाळीत डान्सर नाचवतायत. मंत्री मुंडेंकडून हीच अपेक्षा आहे, अशा शब्दात निलेश राणे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही समाचार
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी यांनी भाजपवर टीका करत आमचे जे शक्तीपीठ आहे त्यावर टीका केली की यश मिळते असं भाजपाला वाटत असेल. पण असे प्रयत्न केले तरी भाजपाला मातीत गाडल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा समाचार घेतला आहे.
‘अरे वेड्या, भारतीय जनता पार्टी मुंबईच्या मातीतून उभी राहीली आहे. २ वरुन ३०२ वर गेलेली हा पार्टी आहे. चार-सहा खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगण्याचं कारण नाहीये. आम्हाला मातीत गाड़णारे स्वतः गाडले गेले, आम्हाला गाडू शकले नाही. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, एसटी संप सुरू आहे आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत, हे आम्हाला सांगताय मातीत गाडून टाकू, भाजपचा कार्यकर्ता हा देखील तुम्हाला पुरेसा आहे, अशा वल्गना करू नका, सामान्य माणसाच्या हिताचे काय काम आपण करू शकतं हा प्रयत्न तुम्ही करा’, असेही फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळायलाच हवा- प्रविण दरेकर
- एका महिलेचे नाव लोकांसमोर आणून खूप चांगले काम केलेस मित्रा’, वानखेडेंचा मलिकांवर निशाणा
- मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर क्रांतीचे संतप्त प्रत्युत्तर, ‘माझी बहिण पीडित आहे आणि..’
- एसटी कर्मचाऱ्यांबाबत ठाकरे सरकारने रडीचा डाव खेळू नये-आ.विनायक मेटे
- ‘…आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत’, धनंजय मुंडेवर फडणवीसांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

