Share

मुकेश अंबानी भारताला करणार बाय बाय?; रिलायन्सचं स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताचे जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे नाव आता फक्त भारतच नाही तर जगभरात चर्चेत आलं आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आण रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या लंडनमधील घराची गेल्या दोन दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. मुकेश अंबानींचं मुंबईतील आलिशान अँटिलिया हाऊस अजूनही उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरत असताना आता त्यांच्या लंडनमधील घराचीही चर्चा सुरू झाली आहे.

लंडन्या बकिंगहॅमशायरमध्ये त्यांनी तब्बल ३०० एकरची मालमत्ता खरेदी केली असून तिथल्या आलिशान घरात मुकेश अंबानी लवकरच शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर खुद्द रिलायन्स इंडस्ट्रीजकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मिड-डेनं दिलेल्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी लवकरच सहकुटुंब लंडनला वास्तव्यास जाणार असल्याचं सांगितलं जात होतं.

या चर्चेनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजकडून त्यावर अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ‘मुकेश अंबानी लंडनमध्ये शिफ्ट होणार असल्याच्या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक आणि त्यांचे कुटुंबीय लंडन किंवा जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही स्थलांतरीत होणार नाहीत. स्टोक पार्क इस्टेटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजनं नुकत्याच खरेदी केलेल्या मालमत्तेचा मुख्य हेतू हा तिथे अत्याधुनिक सुविधांचं गोल्फ क्लब आणि स्पोर्टिंग रिसॉर्ट सुरू करणे हा आहे’, असं रिलान्सय इंडस्ट्रीजकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

बकिंगहॅमशायरमघील स्टोक पार्क या ठिकाणी ही मालमत्ता असून या घरात तब्बल ४९ बेडरुम असल्याचं मिड-डेच्या वृत्तात म्हटलं आहे. या घरात अत्याधुनिक उपचार सुविधा देखील उपलब्ध आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ऐन लॉकडाऊनच्या मध्यावर मुकेश अंबानींनी लंडनमध्ये तब्बल ५९२ कोटींना ही मालमत्ता खरेदी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!