🕒 1 min read
पुणे : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपचा सामना चांगलाच रंगला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली. ‘भाजपने सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम पाहावं’, असा टोला लगावला. त्यावर आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी जयंत पाटलांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे.
तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवू नका. आम्हाला जयंत पाटलांच्या सल्ल्याची गरज नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ‘आम्ही काय करायचं हे ठरवायला आम्ही सक्षम आहोत, तुम्ही तुमचं बघा. तुम्हाला इस्लामपूरच्या बाहेर सांगली जिल्ह्याच्या बाहेर जागा जिंकता आल्या नाहीत. तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका’, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
भाजपने हे सगळं राजकारण करण्यापेक्षा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करावं, असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यावरुन चंद्रकांत पाटलांनी त्यांना सुनावलं आहे. कोरोना काळात अविरत सेवा बजाविणाऱ्या दोन हजार स्वच्छ्ता कर्मचारी आणि ५०० वृत्तपत्र वितरकांचा कृतज्ञता सन्मान सोहोळा पुण्यातील नूमवी शाळेत आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. त्यावेळीच त्यांनी जयंत पाटलांवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘वानखेडेच्या खाजगी सैन्य सदस्याने पत्रकार परिषद घेतली, मात्र मी उद्या सत्य उघड करणार’
- कोर्टाने वानखेडेंची ‘ती’ याचिका फेटाळली, देशाला सत्य कळायला हवे- नवाब मलिक
- समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं; मलिकांचा गंभीर आरोप
- कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी-नितेश राणे
- ‘इंधन करातून २३ लाख कोटी रूपये कमविले’; पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
