🕒 1 min read
नवी दिल्ली : दिवाळीच्या आधी जवळपास दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत होत्या. या पेट्रोल दरवाढीवरुन केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत होती. पेट्रोलच्या दराने चक्क शंभरी पार केली होती. केंद्रावर सर्वसामान्य चांगलेच संतापले. त्यावरुन केंद्राने दिवाळीच्या दिवशी एक्साईज टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये 5 आणि 7 रुपये अशी किंमती कमी झाल्या. त्यानंतर आतामाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘पोटनिवडणुकीत झालेल्या दारूण पराभवातून बोध घेऊन केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्याचा निर्णय घेतला. मुळात भरमसाठ करवाढ करून मोदी सरकारने पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटीतून 23 लाख कोटी रूपये कमविले आहेत. आता आगामी काळात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांत फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकार इंधनदरात कपातीची मलमट्टी करत आहे.’
केंद्र सरकारने काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या करातून मोठ्या प्रमाणात पैसे कमावले. आता हेच पैसे किसान सन्मान व इतर गोष्टींकरता वापरले जात आहेत. नागरिकांच्या खिशातून एका बाजूने पैसे काढून दुसरीकडे तेच पैसे देताना आम्ही पैसे दिल्याचा सरकार आव आणत आहे.
तर दुसरीकडे देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला, तर पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी झाले. तसेच जर भाजपचा पूर्ण पराभव झाला, तर पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल आणखी 7 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारतीय संघावर टीका करणाऱ्यांना जडेजाने सुनावले, म्हणाला..
- कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी-नितेश राणे
- मराठी माणसाच्या भरवश्यावर राजकारण करायचे आणि तो संकटात आल्यावर त्याला उघड्यावर सोडायचे – गोपीचंद पडळकर
- ‘…तर डोक्याविना संजय राऊत दिसतील तिथे’, नारायण राणेंचा खोचक शब्दांत इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
