Share

आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

Published On: 

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र येणाच्या चर्चांनी जोर धरला होता. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळेही या चर्चेला उधाण आलं होतं. आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. शेलारांनी राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर भाजप आणि मनसेच्या युतीबाबत चर्चांना उधाण आलं.

अनेकजण मागील काही काळापासून मनसे आणि भाजपचे सूर बदलले असल्याचंही म्हणत आहेत. या तर्कवितर्कांनंतर आशिष शेलार यांना राज ठाकरेंच्या भेटीविषयी विचारणा केली असता त्यांनी या भेटीचा उद्देश सांगितला. तसेच भेटीत राज ठाकरे यांना पुस्तकही भेट दिल्याचं सांगितलं आहे.

मी पेंग्विन प्रकाशनाचं ‘बूक ऑन मुव्ही’ हे छानसं पुस्तक राज ठाकरे यांना भेट दिलं. त्यात जगभरातील १०० प्रसिद्ध चित्रपटांविषयी माहिती आहे. मी स्वतः हे पुस्तक पाहिलं होतं आणि आवडलं होतं. त्यामुळे या दिवाळीनिमित्त राज ठाकरे यांच्याशी भेटायचं ठरलं तेव्हा मी हे पुस्तक भेट दिलं. तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. ही भेट केवळ आणि केवळ दिवाळीच्या शुभेच्छांचीच होती. या भेटीत या पलिकडे काहीही नाही, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!