Share

‘शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची सवय’, नारायण राणेंचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. यावेळी राणेंनी काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.

यावेळी बोलत असतांना राणेंनी काही दिवसांपूर्वी बारामतीत झालेल्या इन्क्युबेशन सेंटर उद्घाटन कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणावरून टोलेबाजी केली. यासंदर्भात बोलतांना ते म्हणाले की,’मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की फटाके वाजवा पण धूर सोडू नका आणि आवाजही करू नका. असे फटाके फक्त आघाडी सरकारच्याच दुकानात मिळतात. असाच एक धूर बारामतीला सोडण्यात आला. त्याला आवाजही नव्हता, धूरही नव्हता, फक्त वास होता. त्यामुळे लोक परत एकदा प्रदूषणाधीन झाले आहेत.’

दरम्यान, यावेळी राणेंनी मुख्यमंत्री ठाकरे सोबतच शिवसेना खासदार संजय राऊतांना यांना देखील चांगलाच टोला लगावला. ते म्हणाले की,’गेले दोन दिवस संजय राऊतांचा अग्रलेख मी वाचला. देशात विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. यात एक जागा दादरा-नगर हवेलीची अपक्ष उमेदवाराने जिंकली. शिवसेनेने डंका सुरू केला की राज्याच्या बाहेर आम्ही जिंकलो. मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. ती फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याची आहे. पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करायची सवय शिवसेनेला आहेच. कमला डेलकर निवडून आल्या. त्याबद्दल शिवसेना आम्हाला यश मिळालं, आता दिल्ली काबीज करणार म्हणतायत. लिखान करताना त्या व्यक्तीला भान नसेल. रात्री जे करायचं ते दिवसा केल्यामुळे संजय राऊतांबाबत असा परिणाम होतोय का हे मला माहीत नाही’, असे राणे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!