🕒 1 min read
मुंबई : केंद्रानंतर भाजपशासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने देखील इंधनावरील कर कमी करावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधतांना इंधनदर कपातीवर भाष्य केले आहे.
यावेळी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत याबाबत राज्यातील लोकांना काही दिलासा मिळू शकतो का असा प्रश्न विचारण्यात आला असता पवार म्हणाले की,’राज्य सरकारने निश्चित दिलासा देऊ असे म्हटले आहे. पण केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे देणं आहे ते लवकर द्यावे म्हणजे लोकांना अशा प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेता येईल.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’एसटी संघटनेतील व्यक्ती मला भेटले होते. त्यांनी हा संप पुढे न्यायचा नाही हे सांगितले होते. दिवाळीच्या काळात नागरिकांना त्रास देणे योग्य नाही अशी आमची भूमिका आहे. काही लोकांनी टोकाची भूमिका घेतली आहे म्हणून हे घडत आहे. ८० ते ८५ टक्के एसटी रस्त्यावर धावत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना माझे आवाहन आहे की संस्थेच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी हे योग्य होणार नाही. कोर्टाने सुद्धा हा संप कायदेशीर नाही अशा प्रकारच्या निष्कर्षाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोर्टाचा आदर ठेवावा आणि हा विषय संपवावा’, असेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- …अन्यथा एसटी कर्मचारी-कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- पुतळ्या उभारण्याआधीच सेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा श्रेयवाद
- समीर वानखेडेंच्या अडचणीत भर; बनावट प्रमाणपत्रे दावून नोकरी बळकावल्याची भीम आर्मीची तक्रार
- ‘शिवसेनेनं एक निवडणूक काय जिंकली, लगेच पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहायला लागलीय
- त्यांना शुभेच्छा देतो पण त्यांनी फुसके फटाके फोडू नयेत- प्रसाद लाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
