Share

मेहुणे अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायचंय – भास्करराव पाटील

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर काल मतमोजणी पार पडली. काल सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत ६५ टक्के मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यावर अशोक चव्हाणांचे मेहुणे आणि काँग्रेसनेते भास्करराव पाटील खातगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भास्करराव पाटील खातगावकर म्हणाले, काँगेसच्या विजयामध्ये नांदेड जिल्ह्यातील जनतेने दाखवून दिले त्यांचा विश्वास अशोक चव्हाणांच्या नेतृत्वावर आहे. आपल्या भागातील विकास करायचा असेल तर अशोक चव्हाणांचे नेतृत्व मजबूत झाले पाहिजे. इतक्या मोठया संख्येने लोकांनी मतदान केले आणि चव्हाणांचे नेतृत्व मजबूत केले. माझं काम होतं आशीर्वाद देण्याचं मी आर्शीवाद देत राहणार. त्यांना महाराष्ट्राची जनता पुन्हा एकदा मुख्यमंत्री करणार आहे. माझे आशीर्वाद नेहमीच त्यांच्या सोबत राहतील. असे भास्करराव पाटील म्हणाले.

देगलूर-बिलोली मतदार संघात झालेल्या विधानसभा पोटिनवडणुकीत काँग्रेस पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवत कॉंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. अंतापूरकर यांना ३० व्या फेरी अखेर १ लाख ८ हजार ७८९ मते मिळाली. तर भाजपच्या सुभाष साबणे यांना ६६ हजार ८७२ मते मिळाली. वंचितचे डॉ. उत्तम इंगोले यांना ११ हजार ३४७ मते मिळाली. जितेश यांनी तब्बल ४१ हजार ९३३ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे जितेश यांच्या विजयी मतांची आघाडी त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर यांनी २०१९ विधानसभेच्या आघाडीपेक्षा दुप्पट आहे.

हा भाजपाला मोठा धक्का समजला जात आहे, कारण निवडणुकीपूर्वीच शिवसेना उमेदवार सुभाष साबणे यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपाने शिवसेनेचा उमेदवार फोडून निवडणूक जिंकण्याची आस बांधली होती. मात्र काँग्रेसनेते अशोक चव्हाणांच्या मजबुत पकडीमुळे भाजपाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!