Share

‘माझ्या प्रेमाच्या सहवासात…’ म्हणत सोनालीच्या ‘त्या’ फोटोने वेधले लक्ष

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पती कुणालसोबत दुबईमध्ये असून तेथील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सातत्याने ती तिच्या चाहत्यांसाठी काहीतरी नवीन शेअर करत असते. नुकतेच शेअर केलेल्या  फोटोने सर्वांचे लक्ष वेधत आहे.

सोनालीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये दुबईचा शानदार नजारा दिसत आहे. सोनालीने पिवळ्या रंगाचा ऑफ शोल्डर क्रॉप टॉप आणि डेनिमचा स्कर्ट घातला आहे. तसेच तिच्या पतीने टी-शर्ट आणि जिन्स घातली आहे. या फोटोमध्ये ते दोघे वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, ‘माझ्या प्रेमाच्या सहवासात.’  त्यांचे हे फोटो नेटकऱ्यांना आवडले आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रा याने या फोटोवर ‘वाह वाह’अशी कमेंट केली आहे. तसेच तिचे चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत. एका कमेंटला उत्तर देतांना तिने लिहिले आहे की,’मालदीववरून येऊन अडीच महिने झाले. आल्यानंतर मुंबईत एक चित्रपट केला आणि मग आले नवऱ्याकडे दुबईला.’ यासोबत अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

https://www.instagram.com/p/CVqBIMsvFIe/?utm_medium=copy_link

सोनालीने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!