🕒 1 min read
बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी क्रुझ पार्टी प्रकरणी आर्यन खानवर केलेल्या कारवाईमुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ड्रग्ज प्रकरणी रोज नवनवीन वक्तव्य करत होते. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड आहेत, असा धक्कादायक आरोप मलिक यांनी केला आहे. याची सीबीआय आणि इतर केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्ज तस्करी प्रकरणी आरोप केले. यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
यावर भाजप नेतेही संतापले असून मंत्री मलिक यांच्यावर निशाणा साधत आहेत. भाजपच्या चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महाले यांनीही मलिकांवर शाब्दिक घणाघात केला आहे. ‘नवाब मलिकजी, आरोप करताना कुणावर करतोय एवढे तरी भान ठेवाव…!आज वसुबारस, यानिमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते, ‘कावळ्याच्या शापाने गाई गुर मरत नसतात’, असे ट्विट श्वेता महाले यांनी केले.
महाराष्टाचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्र्यांपैकी एक असलेल्या @Dev_Fadnavis यांच्यावर @nawabmalikncp यांच्या सारख्याने केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. जावई बापू ड्रग्ज प्रकरणात अटकेत असल्याने नवाब मियाँ ना ड्रग्जची कावीळ झाली आहे. मेंदू व तब्येत तपासून घ्या.
— Shweta Mahale Patil (@MLAShwetaMahale) November 1, 2021
तर, दुसऱ्या ट्विटमध्ये बोचरी टीका केली आहे. महाराष्टाचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्र्यांपैकी एक असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांच्या सारख्याने केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. जावई बापू ड्रग्ज प्रकरणात अटकेत असल्याने नवाब मियाँ ना ड्रग्जची कावीळ झाली आहे. मेंदू व तब्येत तपासून घ्या, असा सल्लाच महाले यांनी दिला आहे.
तर दुसरीकडे, नवाब मलिक यांचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं आहे त्यांना ताबडतोब रूग्णालयात दाखल करा. एका राजकीय नेत्यांबरोबर अनेक लोक फोटो काढतात, असेच आरोप स्वर्गीय आर आर पाटील साहेब व अजित पवार यांच्यावर देखील झाले होते. नवाब मलिक नको ती मर्यादा ओलांडू नका, भारी पडेल, असा इशाराच निलेश राणे यांनी मलिकांना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महागडे कपडे आणि वस्तूवरून केलेल्या आरोपांवर समीर वानखेडेंचे मलिकांना प्रत्युत्तर
- मोठी बातमी! एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर
- ‘असे साधुसंत येती घरा, तोची राष्ट्रवादीचा दिवाळी दसरा’; खोतांचा राष्ट्रवादीला टोला
- फटाके फोडा पण धूर काढू नका; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला
- वाचाळांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही; फडणवीस-मलिकांचा वाद शिगेला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
