🕒 1 min read
बीड : बीड जिल्ह्यात गेल्या १० महिन्यात २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र याकडे मुख्यमंत्र्यांना पाहायला वेळ नाही. अतिवृष्टीची मदत जाहीर मात्र अद्याप शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही. हे मुख्यमंत्री फक्त बोलघेवडे आहेत. त्यांना आर्यन अन शाहरुखच्या बचावातून वेळ मिळाला असेल तर त्यांनी शेतकरी आत्महत्येकडे लक्ष द्यावे असा टोला शिवसंग्रामचे नेते तथा आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
शेतकऱ्यांची आत्महत्या ही गोष्ट शेतकऱ्यांची लेकरं म्हणवून घेणाऱ्यांसाठी लाज आणणारी बाब आहे. प्रशासनाने किती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन चौकशी केली?’ असा सवाल मेटे यांनी केला. ‘शेतकऱ्यांचा प्रश्नांसाठी दिवाळीनंतर शिवसंग्राम रस्त्यावर उतरणार आहे. हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही. ’ असा इशारा मेटे यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही. दोन महिने झाले तरी मराठा आरक्षणाबाबत सरकारने साधी बैठकही बोलावली नाही. कोणत्याही परिस्थितीत ठाकरे सरकारला मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. सरकार चालवणाऱ्याला शरद पवारांना मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही. पवारांना बाकी सगळ्या विषयांवर बोलायला वेळ आहे असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अधिकारी नोकरी करत असताना मंत्री जेलची धमकी देतोय’, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची नाराजी
- ‘महाविकास’ आघाडी सरकार म्हणजे तीन बायकांचा संसार; ओवेसींचा घणाघात!
- दिवाळीनिमित्त औरंगाबादेतील बाजारपेठेत तुफान गर्दी; या गर्दीत भेटू शकतो ‘कोरोना’!
- सरकार कधी जातंय यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवले- बाळासाहेब थोरात
- ‘शेतकऱ्यांना बळजबरीने सीमेवरून हटवले तर सरकारी कार्यालयात…’, राकेश टिकैत यांचा इशारा


