🕒 1 min read
मुंबई : राज्यात चिकनगुनियाचे पाच वर्षातील सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील चिकनगुनिया रुग्णसंख्या दोन हजारांवर पोहचली आहे. यापार्श्वभूमिवर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे.
भातखळकर ट्विटमध्ये म्हणाले, २०१६ नंतर या वर्षी पुन्हा एकदा राज्यात चिकनगुनियाचा उद्रेक झालेला आहे. गेल्या ४ वर्षात चिकनगुनियाच्या रूग्णांनी २ हजारांचा आकडा ओलांडला नव्हता तो यावर्षी ऑक्टोबरमध्येच पार केला. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीची नोटीस मिळाल्याबरोबर चिकनगुनिया झाला इतका हा गंभीर रोग आहे.’ अशी खोचक टीका भातखळकरांनी केली आहे.
२०१६ नंतर या वर्षी पुन्हा एकदा राज्यात चिकनगुनियाचा उद्रेक झालेला आहे. गेल्या ४ वर्षात चिकनगुनियाच्या रूग्णांनी २ हजाराचा आकडा ओलांडला नव्हता तो यावर्षी ऑक्टोबरमध्येच पार केला.
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ED ची नोटीस मिळाल्याबरोबर चिकनगुनिया झाला इतका हा गंभीर रोग आहे pic.twitter.com/XZRCnHIP3N— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 31, 2021
राज्यात गेल्या चार वर्षाच्या तुलनेत यावर्षी चिकनगुनियाचा प्रसार वेगाने होत आहे. यंदाच्या ऑक्टोबर महिन्यातच रुग्णसंख्येने दोन हजारांचा आकडा पार केला आहे. पाच वर्षापूर्वी म्हणजे २०१६ साली राज्यात चिकनगुनियाचे २ हजार ९९४ रुग्ण अढळून आले होते. मात्र यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांतच दोन हजारांहून अधिक रुग्ण अढळले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.
राज्यातील पाच वर्षांची चिकनगुनिया रुग्णांची स्थिती
२०१६ मध्ये २९४९ रुग्ण अढळले होते. २०१७ मध्ये एकूण १४३८ रुग्ण अढळले, २०१८ मध्ये १००९, २०१९ साली १६४६ रुग्ण अढळले, २०२० मध्ये ७८२ तर २०२१ मध्ये दहा महिन्यांतच २००६ रुग्ण आढळून आले असून अजून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘एमआयएम महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढणार’, असदुद्दीन ओवेसींची घोषणा
- पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस भेटीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- शरद पवारांबद्दल अपशब्द वापरल्याने तुषार भोसलेंविरोधात सहा तक्रारी दाखल
- ‘परमबीर सिंह बेल्जियममध्ये कसे गेले?’ संजय निरुपमांचा सवाल
- चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत, ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलायला पाहिजे- धनंजय मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

