Share

दिवाळीनंतर घोटाळे बाहेर काढणार; किरीट सोमय्यांची महाविकास आघाडीला इशारा

Published On: 

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. दिवाळीनंतर तीन मंत्र्यांसह जावयाचे सहा घोटाळा उघड करणार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे टेन्शन वाढले आहे.

आता दिवाळीनंतर तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे व जावायचे तीन असे एकूण सहा घोटाळ्यांचा पदार्फाश करणार असल्याचे सोमय्या यांनी रविवारी ट्विटरवरून जाहीर केलं. किरीट सोमय्या यांच्याकडून राष्ट्रवादीसह शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात आघाडी उघडण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य काही नेत्यांवर सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात तपास यंत्रणांकडे कागदपत्रेही सादर केली आहेत.

दरम्यान, दिवाळीनंतर फटाके फोडणार असं सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे टेन्शन वाढवले आहे. सोमय्या यांनी या मंत्र्यांची नावे जाहीर केली नसल्याने हे मंत्री नेमके कोण, याची चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!