Share

ओबीसी नेते छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे येणार एकाच व्यासपीठावर

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे विस्ताराच्या कार्यक्रमाला ओबीसीचे दोन दिग्गज नेते नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व माजी मंत्री पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर येणार आहे. ओबीसी राजकीय आरक्षणामुळे वातावरण तापलेले असताना हे दोन्ही ओबीसी नेते एकत्र येत असल्याने आता या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणाऱ्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम येत्या १ नोव्हेंबरला होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून केले जात आहे. हा कार्यक्रम विभागीय संदर्भ रुग्णालय शालिमार येथे सकाळी १० वाजता होणार आहे. काही दिवसांपासून राज्यात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर मधल्या काळात बरेचदा लुटले गेले. परंतु, त्या माध्यमातून ओबीसी समाजाचे नेते वेगवेगळ्या स्तरावर आंदोलन किंवा मार्गदर्शन या माध्यमातून लढा देत होते.

आता विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय इमारत कार्यक्रमाच्या माध्यमातून ओबीसीसाठी महत्त्वपूर्ण असलेले अन्न आणि पुरवठामंत्री छगन भुजबळ तसेच ओबीसीसाठी नेहमीच झटणाऱ्या माजी मंत्री पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर येणार आहे. दोघेही नेते ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन नेते एकत्र येणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे संपर्कनेते जयकुमार रावल तसेच अन्य मान्यवर येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!