Share

करण कुंद्राचे एक्स गर्लफ्रेंडविषयी वक्तव्य म्हणाला ‘शमिता,अनुषा मध्ये साम्य…’

Published On: 

मुंबई : सध्या छोट्या पडद्यावरील एका रिअॅलिटी शोने सर्वांचे लक्ष वेधत आहे, तो म्हणजे ‘बिग बॉस १५’. हा रिअॅलिटी शो सर्वांच्या चर्चेत आहे.  मायशा आणि ईशाननंतर आता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या रिलेशनच्या चर्चा रंगल्या आहेत. करणने सर्वांसमोर प्रेमाची कबूली दिली आहे. यामुळे त्या दोघांकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान त्याने त्याची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरची तुलना बिग बॉसमधील स्पर्धक अभिनेत्री शमिता शेट्टीशी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लव्ह लाइफ तसेच रिलेशनविषयी बोलताना दिसत होते. त्यावेळी तेथे घरातील इतरही काही स्पर्धक होते. दरम्यान, तेजस्वी करणच्या एक्स गर्लफ्रेंडविषयी बोलताना दिसते. त्यानंतर करण म्हणाला की प्रतीक सहजपालने एक यादी तयार केली आहे. या यादीमध्ये शमिता शेट्टी आणि अनुषा दांडेकर यांच्यामध्ये साम्य असणाऱ्या गोष्टी आहेत. शमिता आणि अनुषा यांच्यांमध्ये खूप साम्य आहे.

तसेच दोघीही इमानदार, भावनिक, एक गोष्ट करायची ठरवली तर ती केल्या शिवाय सोडणार नाही, अशा अनेक गोष्टी सारख्या आहेत असे करण म्हणाला. तसेच प्रतिकने त्या दोघींच्या केसांचा रंग देखील सारखा असल्याचे म्हटले. त्यानंतर तेजस्वी करणला म्हणते की जर तू शमिताच्या प्रेमात पडला तर. त्यावर उत्तर देत करण म्हणाला, नाही असे काही होणार नाही. शमिता राकेश बापटवर प्रेम करते. त्यामुळे असे काही शक्य नाही. या रिअॅलिटी शोमुळे प्रेक्षकांचे मनोरंजनासह अनेक जोडया देखील बनत असल्याने चांगलेच चर्चेत येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!