🕒 1 min read
मुंबई : उद्योजक राज कुंद्राला अश्लिल व्हिडीओ प्रकरणात १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणात जामीन मिळाला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर राज कुंद्रा यांना जामीन दिला आहे. राज कुंद्रावर अश्लील व्हिडीओ बनवून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणात चर्चित असलेली अभिनेत्री शर्लिन चोप्रविरोधात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने मानहानीचा गुन्हा दाखल केली आहे. यावर आता शर्लिनने ट्वीट करत उत्तर दिले आहे.
Here are the first & last pages of my Reply Notice, sent by my Legal Team on Oct 23, 2021 to Ripu Sudan alias Raj Kundra and Shilpa Shetty Kundra with reference to their Defamation Notice. pic.twitter.com/ucjhT7fadx
— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)???????? (@SherlynChopra) October 25, 2021
शर्लिनने तिच्या ट्विट करत लिहिले की, ‘रिपु सूदन उर्फ राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांनी माझ्या विरोधात केलेल्या मानहानीच्या नोटीशीला माझ्या लीगल टीमने २३ ऑक्टोबर २०२१ रोजी उत्तर दिले आहे. मी दिलेल्या जवाबातील पहिल्या आणि शेवटच्या पानाचा हा फोटो’ या आशयाचे ट्वीट शर्लिनने केले.
काही दिवसांपूर्वी शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर गंभीर आरोप केले होते. मानसिक आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी शर्लिनने १४ ऑक्टोबर रोजी ही तक्रार दाखल केली. सोशल मिडीयावर तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणते की, ‘मी राज कुंद्राविरोधात लैंगिक छळ, फसवणूक व धमक्या दिल्याची तक्रार केली आहे. त्याने अंडरवर्ल्डची धमकी दिली. नीट लक्षात असू द्या,की तुम्ही माझ्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत,’ असे तिने म्हंटले होते.
महत्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- भाजप सरकारच्या काळात गोव्याची अवस्था केविलवाणी झालीये; शिवसेनेचा टोला
- भाजपच्या कार्यक्रमात गुंडांच्या सौभाग्यवतींची हजेरी; गदारोळ होताच चंद्रकांत पाटील म्हणाले, पास नव्हते!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
