औरंगाबाद : महिला बचत गटांना स्वावलंबी होण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने मिनी ट्रॅक्टर योजना सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी समाजकल्याण विभागाच्या वतीने मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु यंदा समाजकल्याण विभागालाच निधीची प्रतीक्षा करण्याची वेळ आली असल्याने महिलांना मिनी ट्रॅक्टर मिळणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महिला बचत गटांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी चालना मिळावी यासाठी मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी प्रत्येकी ट्रॅक्टर खरेदीसाठी ३ लाख १५ हजार रुपये निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी महिला बचत गटांची निवड केली जाते. यंदा ६० महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी निधी दिला जाणार आहे. ६० मिनी ट्रॅक्टरसाठी १ कोटी ८९ लाख रुपयांची गरज असून या निधीची मागणी समाजकल्याण विभागाने वरिष्ठ स्तरावर केली आहे.
मात्र निधी मिळाला नसल्याने समाजकल्याण विभागालाच निधीची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. आधीच कोरोनामुळे अनेक महिलांना आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागले. त्यात मिनी ट्रॅक्टरचा आधार होईल. अशी अपेक्षा महिला बचत गटांना आहे. परंतु समाजकल्याण विभागालाच निधीची प्रतीक्षा करण्याची वेळ आली असल्याने महिला बचत गटांनी काय करावे? असा प्रश्न महिला बचत गटांना पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ
- ‘आर्यनविरोधात कट रचला जातोय, त्याची अटक चुकीची’; रोहतगींचा न्यायालयात युक्तीवाद
- नाइट सूट’मध्ये करवा चौथ साजरा; रवीना टंडनचे फोटो व्हायरल
- ‘विरोधी पक्षाची अवस्था बिघडलेल्या बबड्यासारखी झालीये’, निलम गोऱ्हेंचा टोला
- ‘ठाकरे’ सरकारतर्फे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ; आ. डॉ. मनीषा कायंदेंच्या मागणीला यश!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
