Share

‘विरोधी पक्षाची अवस्था बिघडलेल्या बबड्यासारखी झालीये’, निलम गोऱ्हेंचा टोला

Published On: 

नांदेड : इंधन दरवाढ, कोरोना काळातील अपयश आणि अच्छे दिनाच्या स्वप्नांचा झालेला चुराडा याचे अपयश झाकण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून दररोज कथित घोटाळे काढण्यात येत आहेत. मूळ प्रश्नांपासून लोकांना भटकावण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची अवस्था बिघडलेल्या बबड्यासारखी झाली आहे, असा टोला शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी भाजपला लगावला आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी त्या नांदेडात आल्या होत्या. यावेळी गोऱ्हे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, भल्या पहाटेचे काही तासांचे सरकार आल्यानंतर केंद्राकडून आलेले दहा हजार कोटी रुपये परत करण्याचा कोत्तेपणाचा निर्णय भाजपाने घेतला होता. अन् आता शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार मदत करीत असताना कोट्यवधींची मदत यांना फुटकी कवडी वाटते याचे आश्चर्य आहे.

मोदी सरकारबद्दल लोकांमध्ये संताप आहे. पण अपयश झाकण्यासाठी दररोज बर्निंग ट्रेनसारखे आरोप करीत सुटायचे हेच काम सुरु आहे. भाजपाचे नेते शिवसेनेचे आमदार खिशात असल्याचे सांगत सुटले आहेत. परंतु यांच्या खिशात केवळ काडीपेटी आहे. काडी टाकायची, आग लागली तर उत्तम नाही तर निघणाऱ्या धूरामुळे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकायची असा यांचा अजेंडा आहे असा आरोपही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!