Share

वानखेडे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याची ॲड कनिष्क जयंत यांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक प्रकरणी अनेक घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना समीर वानखेडे यांच्या कामावर संशय व्यक्त करत अनेक आरोप करण्यात आले आहे. यातच रविवारी पंच प्रभाकर साईलने केलेल्या 25 कोटींच्या खंडणीच्या आरोपामुळे प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.

यानंतर आता ज्येष्ठ वकील कनिष्क जयंत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

ॲड. कनिष्क जयंत यांनी १२ आणि १६ ऑक्टोबर या दोन तारखांना आर्यन खान क्रुझ प्रकरणात के. पी. गोसावी, मनीष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतीक गाभा, आणि अमीर फर्निचरवाला यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. या लोकांनी एकत्र येऊन कट कारस्थान करत आर्यन खानचे अपहरण केले आणि त्याच्या वडिलांकडून म्हणजेच शाहरुख खानकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे.

वानखेडे यांची या सर्व प्रकरणात भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले. आता यावरुन समीर वानखेडे यांच्या अडचणीत अधिकच वाढत आहे. दरम्यान, वानखेडेंनी स्पष्टीकरण देत मलिकांनी केलेले आरोप खोटे असल्याचं म्हंटल.

वानखेडेंनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिली. समीर वानखेडे स्वत: कोर्टाला काही माहिती देण्यासाठी साक्षीदाराच्या पिंज-यात उभे राहिले. मला वैयक्तिकरित्या काही जणांकडून लक्ष्य केलं जात आहे. माझ्यावर, माझ्या कुटुंबियांवर सतत आरोप केले जात आहेत. आजही माझे काही खाजगी फोटो लिक करण्यात आले आहेत, असंही वानखेडे पत्रात म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!