Share

‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक प्रकरणी अनेक घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना समीर वानखेडे यांच्या कामावर संशय व्यक्त करत अनेक आरोप करण्यात आले आहे. यातच रविवारी पंच प्रभाकर साईलने केलेल्या 25 कोटींच्या खंडणीच्या आरोपामुळे प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. यावर समीर वानखेडे पत्नी व मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

एका मुलाखतीमध्ये क्रांती रेडकरने नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत सांगितले की, ‘आमच्या मुलांसह मी आणि समीर मालदीवला गेलो होतो. आम्ही ज्याठिकाणी राहत होतो, तिथे कोणतेच सेलिब्रिटी नव्हते. जर कोणाला उत्तरं हवी असतील तर त्यांनी थेट कोर्टात जावं आणि तिथे मागणी करावी. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा खेळ खेळत बसू नका. एका छोट्याशा गावातून मुंबईला येऊन अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर स्वत:चं अस्तित्व निर्माण करणाऱ्यावर मला खूप अभिमान आहे.’ असेही ती यावेळी म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘जर तुम्हाला समीर चुकीचा वाटत असेल, तर चौकशी करा आणि पुरावे सादर करा. त्याने कधी, कुठे पैसे घेतले ते दाखवा. तुमच्याकडे फोन चॅट, स्टिंग ऑपरेशन किंवा इतर कुठलेही पुरावे आहेत का? ८ कोटी, १८ कोटी, २५ कोटी, तुमच्या मनात जो आकडा येतोय त्यावरून तुम्ही काहीही बडबड करत आहात. देशसेवा करणाऱ्या एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा हा अपमान आहे. त्याच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत असे आरोप पहिल्यांदाच झाले आहे.’ असे उत्तर क्रांतीने नवाब मलिक यांना दिले.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!