Share

मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही खरी बातमी असावी; औरंगाबाद दौऱ्यावरुन भातखळकरांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील अतिरिक्त इमारतीचे उद्घाटन आज होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद येथे दाखल झाले आहेत. खंडपीठाच्या मागील बाजूस नव्याने बी आणि सी विंग तयार करण्यात आले आहे. मात्र या अ‍ॅनेक्स बिल्डिंगच्या उद्घाटनावरून वाद निर्माण झाला होता. या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम व पत्रिकेवर वकील संघाची दखल न घेतल्याने खंडपीठ वकील संघाने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर निघाले असून ३६ दिवसानंतर त्यांचा हा दुसरा दौरा आहे. खरेतर ही बातमी नसून ते घरातून बाहेर पडले आहेत ही खरी बातमी असावी, असा टोला अतुल भातखळकरांनी लगावला आहे.

दरम्यान, ‘मुख्यमंत्री जी, औरंगाबाद जिल्ह्यात आहात तर पैठणच्या तोंडोळी गावाला जरूर भेट देत परवाच्या सामुहिक बलात्कार पिडीत परीवाराची भेट घ्या. त्या २० दिवसाच्या चिमुकलीची भेट घ्या जिच्या हाताला नराधमांना चटके दिलेत. कुटुंबप्रमुखांच्या भेटीने त्यांना नक्की दिलासा मिळेल व आर्थिक मदत ही, असं भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!