Share

‘कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या’, ‘काँग्रेस’ची मागणी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: भारताने १०० कोटी लसीकरण करत ऐतिहासिक विक्रम केला आहे. यावरून जगभरात देशाचे कौतुक केले गेले. अशात आत कॉंग्रेसने एक मागणी मोदी सरकारकडे केली आहे. १०० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले असले तरी कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख लोकांच्या कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या. अशी मागणी काँग्रेस नेते प्रहार वल्लभ यांनी केली आहे.

तसेच जगभरात ५० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले भारत व चीन हे फक्त दोन देश आहेत. भारताने पहिल्यांदा १०० कोटींचे लक्ष्य गाठल्याची माहितीही चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मोदींनी चुकीची माहिती देऊन कौतुकाची थाप थोपटून घेऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान निवडणूक रोख्यांतून मिळणाऱ्या पैशातून भाजपने लसीकरण मोहीम चालवावी, इंधनावरील करवाढ करून २३ लाख कोटी रुपये केंद्राने मिळवले असून त्यापैकी फक्त २ टक्के म्हणजे ३५ हजार कोटी लसीकरणावर खर्च केले गेले असल्याचा आरोपही
प्रहार वल्लभ यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!