Share

मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : उर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याविषयी एक आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर भाजपकडून मुख्यमंत्री काय भूमिका घेणार अशी विचारणा होत होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वरील वक्तव्य केलं आहे.

माकड आपला पूर्वज आहे. माकडाला आपण वंशज मानलंच पाहिजे. माकड आहे म्हणून आज आपण आहोत. वीर सावरकर हे वीर सावरकर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः सावरकरवादी आहेत. कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर सूर्याचं तेजच त्याला जाळून टाकेल, असं सडेतोड उत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले. ते नाशिकमध्ये बोलत होते.

गेल्या असंख्य वर्षात सावरकरांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. या देशातील विशिष्ट वर्गाने सावरकरांना कायम बदनाम करण्याचा कायम प्रयत्न केला. मात्र ते महानायक राहतील, असे राऊत म्हणाले. तसेच सावरकरांचं देशातील स्वातंत्र्य लढ्यातील योगदान इतिहासातील पानांवरून कोणाला पुसता येणार नाही, असेही राऊतांनी त्यांनी निक्षून सांगितले आहे.

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यावर एक आक्षेपार्ह ट्विट केलं. नंतर काही क्षणात हे ट्विट व्हायरल झाले. तसेच सर्व स्तरातून राऊत यांचा निषेध केला गेला. वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नंतर नितीन राऊत यांनी हे ट्विट डिलीट केले. मात्र भाजपने आक्रमक होत राऊत यांनी माफी मागावी अशी भूमिका घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!