Share

‘तुमचंच सुरू ठेवायचं असेल तर ठेवा, मी निघून जातो’, अजित पवार पत्रकारांवर संतापले

Published On: 

🕒 1 min read

पुणे : जरंडेश्वर साखर कारखान्यावरुन होणाऱ्या आरोपांवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. त्यांनी महाराष्ट्रात झालेल्या साखर कारखाना खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची सर्व माहिती अजित पवारांनी सादर केली. महाराष्ट्रात ६५ साखर कारखाने चालवायला दिले किंवा विकले, असे अजित पवार म्हणाले. त्यांनी साखर कारखान्याची विक्री आणि खरेदी करणाऱ्याचे नावे पत्रकार परिषदेत वाचून दाखवले.

यावेळी माध्यमांनी पवार यांनी अनेक मुद्द्यांवर प्रश्नही विचारले. राष्ट्रवादीच नेते तथा मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली, त्यांच्या कुटुंबियांना बोगस म्हटले त्यावर विचारले असता उत्तर देण्याचे अजित पवारांनी टाळले. नो कमेंट, म्हणत मला यावर बोलायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हंटले.

अजित पवार म्हणाले, ‘मला त्याबद्दल काही विचारू नका. मलिकांचे प्रश्न त्यांना विचारा. समीरचे प्रश्न समीर यांना विचारा. त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी आलो नाही. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विद्यापीठ पुलाच्या बाबत बोलायला आलो. मी मागेही सांगितले की इतरांनी काही केले आणि ते असंे म्हटले यावर उत्तरे द्यायला मी बांधिल नाही.’

अजित पवार हे मलिक यांच्या प्रश्नावर बोलण्यास नकार देत असताना पत्रकार त्यांना सतत प्रश्न विचारत होते. त्यावर ते चांगेलच भडकले. पत्रकारांना उद्देशून ते म्हणाले की, ‘थांबा ना साहेब. मी त्यांचं उत्तर द्यायला बांधिल नाही. मी तुम्हाला सांगितलं ना मलाही एक अधिकार आहे ना, नो कॉमेंट म्हणायचा. आहे की नाही? जसा तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे ना, तसा मलाही नो कॉमेंट म्हणायचा अधिकार आहे. तुम्ही मला ते प्रश्न विचारू नका. मी उत्तर देणार नाही. मला काही तेवढेच उद्योग नाही. त्याबाबत मी जे काही सांगतो ते ऐकून घ्या. तुमचंच सुरू ठेवायचं असेल तर ठेवा मी निघून जातो, अशी संतप्त प्रतिक्रियाच अजित पवारांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!