🕒 1 min read
यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील वसंतनगर व वाई- मेंढी या गावातील दोन आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी एक, एक लाखाचा धनादेश आमदार संजय राठोड यांच्या हस्ते दिग्रस येथील शासकीय विश्रामगृहात देण्यात आला. वसंतनगर येथील शेतकरी चंदन मदन आडे याने शेतीवरील कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तसेच तालुक्यातील वाई मेंढी येथील शेतकरी प्रदीप विश्वनाथ राऊत याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी या उद्देशाने आमदार संजय राठोड यांनी पाठपुरावा करून त्यांचा अहवाल शासनाला पाठवून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख रुपये प्रमाणे २ शेतकरी कुटुंबियांना धनादेश मिळवून देण्यासाठी मदत केली. या धनादेशाचे वाटप आमदार संजय राठोड यांच्या हस्ते देण्यात आला.
दरम्यान, काही महिन्यापूर्वी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वादात सापडलेल्या माजी वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाण या २२ वर्षाच्या मुलीचा पुण्यातील राहत्या घरातून पडून ७ फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. याची चौकशी सध्या सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद येथे आमदार राठोड यांनी आपल्यावरील आरोपांबाबत भाष्य केले होते. ‘राजकारणात आरोप होतात, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीअंती तथ्य असेल तर शिक्षा झाली पाहिजे. पण सध्या आरोप करुन लगेच तथ्य न पाहता शिक्षा देणे पद्धत चुकीची असून हा पायंडा बदलला पाहिजे. कार्यकर्ता म्हणून सर्व पक्षांच्या नेत्यांना विनंती आहे हे बदला, असे भावनिक आवाहन राठोड यांनी केले. राजकारणात कोणत्याही पक्षात कार्यकर्ता बनायला अनेक वर्षे जातात. मला राजकारणात ३० वर्ष लागली. या काळात लोकांनी ४ वेळेस निवडून दिले असल्याचं देखील राठोड यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- आत्मविश्वासाने लढा विजय आपलाच; चंद्रकांत पाटलांकडून नगरसेवकांना विश्वास
- भारत-पाकिस्तान सामन्यादिवशी सानिया मिर्झाने सोशल मीडियापासून दूर राहण्याचा घेतला निर्णय
- ‘अजितदादांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का?’
- ‘बकऱ्याला कापायच की जगू द्यायचं, हे बकरा नसतो ठरवत, तो निर्णय कसायाचा असतो’
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
