🕒 1 min read
मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन राज्यात जोरदार राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. क्रुझवरील ड्रग्स पार्टीतून पकडलेल्यांमध्ये भाजपच्या नेत्यांच्या नातलगांचा समावेळ होता. मात्र त्यांना सोडून देण्यात आलं, असा आरोप मलिक यांनी केलाय.
या पार्श्वभूमीवर एनसीबीकडूनही पत्रकार परिषद घेण्यात आली. तेव्हा पत्रकारांनी या ड्रग्स पार्टीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार होते का? असा सवाल विचारला. त्यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांकडून नावं जाहीर करण्यास नकार देण्यात आला.
जे नाव तुम्ही घेत आहात. सध्या तपास सुरु आहे आणि असं कुठलंही नाव घेणं योग्य होणार नाही. आम्ही एक जबाबदार एजन्सी आहोत आणि कुठलंही लूज कमेंट करत नाहीत. आम्ही पेपरवर जे आहे त्यावर बोलतोत, जे पुरावे आहेत त्यावर बोलतोत. बाकी नाही, असं एनसीबी अधिकारी समिर वानखेडे म्हणाले. पार्थ पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर एनसीबी अधिकारी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut : “…अपेक्षा न ठेवता आपला स्वतंत्र संसार मांडा”, संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना सल्ला
- Aditya Thackeray : “युवासैनिकांनो, आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता…”, आदित्य ठाकरेंचे आवाहन
- Draupadi Murmu : “अवघ्या 15 मिनिटांपूर्वी मोदींनी फोन करून…”, द्रौपदी मुर्मू यांनी सांगितला ‘तो’ किस्सा
- Devendra Fadnavis : “ज्यांनी बांठिया आयोग नेमला, तेच आता…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
- Sanjay Raut : “आमदार-खासदार फोडून सरकारे बनविली…”, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा


