Share

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे- राजू शेट्टी

Published On: 

उस्मानाबाद : पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीत पैसे नसतील तर सरकार मधील मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे, असा खोचक सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उस्मानाबादेत बोलताना दिला आहे. राजू शेट्टी यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेवून उस्मानाबाद जिल्ह्यातील दौऱ्याला सुरूवात केली.

वाघोली येथे एफ.आर.पी.चा जागर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अडीच महिन्यानंतरही मदतीची आस लावून बसलेले आहेत. तर मराठवाड्याती शेतकऱ्यांनाही अद्याप काही मिळालेले नाही. सरकारला काही द्यायचे असेल तर त्यांनी तसे लवकर सांगावे असा, इशाही त्यांनी दिला.

सरकारच्या तिजोरीत पैसा नाही मग, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता एक रकमी कसा मिळतो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करेल असे वाटत नाही, अशी खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली. राज्य आणि केंद्र सरकार दोघांवरही त्यांनी या वेळी टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!