Share

राणेसाहेब, हप्तेखोरांची नावं जाहीर कराच; वैभव नाईक यांचं ओपन चॅलेन्ज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल हप्तेखोरांची नाव जाहीर करण्याचा इशारा शिवसेनेला दिला होता. राणेंच्या इशाऱ्याला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सडेतोड उत्तर देत राणेंना ओपन चॅलेन्ज केलं आहे.

राणेंंनी हप्तेखोरांची नावं जाहीर करावीच. कोणाला हप्ते दिले, कोणी हप्ते घेतले, कोणाच्या मुलाने ठेकेदारावर चिखल फेकला, कुठल्या बंधराचा निधी बुडवला, हे सगळं राणेंना माहिती आहे. ते त्यांनी जाहीर करावं, असं वैभव नाईक म्हणाले आहेत. राणे नावे जाहीर करणार नाहीत, असा विश्वास नाईकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, जाहीर सभेमध्ये सत्ताधाऱ्यांचा आणि सिंधुदुर्गाच्या विकासाच्या आड येणाऱ्यांचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा राणे यांनी दिला आहे.

आज एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.आज 20 वर्षांनंतर चिपी विमानतळाचे बांधकाम पूर्ण होऊन त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे. या निमित्ताने मुख्ममंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येणार असल्याने ते एकमेकांना भेटणार का, काय बोलणार यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!