🕒 1 min read
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. तर केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे ऑनलाईन पद्धतीने दिल्लीतून या लोकार्पण सोहळा उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
त्यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मात्र, विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
आज कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाचं ठरणाऱ्या, मोदी सरकारच्या प्रयत्नाने साकारलेल्या चिपी विमानतळाचं उद्घाटन होतंय.
या कार्यक्रमाला विधानसभा व विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण न देऊन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे. pic.twitter.com/w7riFtxPlC— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 9, 2021
‘आज कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाचं ठरणाऱ्या, मोदी सरकारच्या प्रयत्नाने साकारलेल्या चिपी विमानतळाचं उद्घाटन होतंय. या कार्यक्रमाला विधानसभा व विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण न देऊन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे’ असे ट्विट भातखळकर यांनी केलंय.
दरम्यान, आयोजकांनी हा निर्णय का घेतला मला माहीत नाही. राज्यात कुठल्याही नव्या प्रकल्पाचं उद्घाटन होत असेल तर विरोधी पक्षनेत्याला निमंत्रण द्यायला हवं. याबाबत कुठलाही नियम नसला तरी काही प्रथा-परंपरा असतात. प्रथा, परंपरांना कायद्याइतकंच महत्त्व असतं. जे काही राज्यातल्या सरकारनं केलंय ते चुकीचं आहे. हा काही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या घरचा कार्यक्रम नाही. मुलाचं लग्न नाही. फडणवीसांना आमंत्रण द्यायला हवं होतं. ही संकुचित वृत्ती आहे,’ अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- आयकर विभागाच्या छाप्यावर छत्रपती उदयनराजे म्हणाले, मला यावर…
- ठाकरे-राणे एका व्यासपीठावर, चिपी विमानतळाचं धूमधडाक्यात होणार उद्घाटन
- महाराष्ट्राला, बॉलिवूडला बदनाम करायचे प्रकार सुरु; आर्यन खान प्रकरणी शिवसेनेचा भाजपवर गंभीर आरोप
- नवाब मलिकांची आज पत्रकार परिषद; एनसीबीची पोलखोल करणार!
- लसीकरणाला गती देण्यासाठी सुरु करण्यात आलेले ‘मिशन कवच कुंडल’ अभियान नेमके आहे तरी काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
