Share

ओला दुष्काळ जाहीर करा, शिवसेना आमदार संतोष बांगर यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

हिंगोली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पिक निघून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने लवकर निर्णय घ्यावा. तसेच कळमनुरी मतदार संघांत आणि हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेत त्यांना या संबंधीचे निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी ही मागणी केली आहे.

अतिवृष्टीमुळे कळमनुरी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे त्यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच त्यांच्याकडे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

या वेळी आमदार बांगर यांच्यासोबत जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. हिंगोलीसह मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!